विशेषशहरसामाजिक

परप्रांतिय कामगारांची होणारी अमानवीय प्रवासी वाहतूक विरोधात परिवहन विभागाची कारवाई..

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, व शिव श्रमिक मजदुर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते मनोज कसबे यांच्या वतीने चिखली कुदळवाडी परप्रांतिय कामगारांची होणारी अमानवीय प्रवासी वाहतूकीच्या विरोधात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अतुल आदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवर तत्परतेने कार्यवाही करीत चोवीस तासांच्या आत गुरूवारी दि.11 मे 2023 रोजी रात्री 11:00 च्या सुमारास चिंबळी फाटा मोशी येथे बस क्रमांक UP55 AT 1893 या खाजगी प्रवासी बस मधे प्रवासी वाहतूक संख्येच्या दूप्पट प्रवासी असल्याचे दिसून येताच मोटार वाहन निरीक्षक अनुश्री केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यवाही करीत 1लाख दोनशे रुपये दंड ठोठावला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाई बद्दल समाधान व्यक्त करीत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, व शिव श्रमिक मजदुर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते मनोज कसबे, उपाध्यक्ष सतिश भांडेकर, सचिव गोपाल कच्छवे, कार्याध्यक्ष अमित मोहिते यांच्या वतीने परिवहन अधिकारी यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी मनोज कसबे बोलले परिवहन विभागाने अशा सर्व प्रवासी बसेस वर लक्ष ठेवून या ही पेक्षा कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अपघातात जिवीतहानी होणार नाही. या वेळी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी ही आश्वासन दिले की यापुढेही अशा स्वरूपाची कारवाई सुरूच राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!