
प्रतिनिधी पिपरी चिंचवड दि. १४ नोहेंबर २०२३, दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञात आरोपी यांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार कशाचेतरी सहायाने कट करून त्यावाटे आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रुकिंमतीचे ॲप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन नेले होते. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७७१/२०२३, भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुशंगाने सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषन करुन सदर गुन्हा करणारे आरोपी हे कुर्ला मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न केले. त्याअनुशंगाने दरोडा विरोधीतील पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस हवालदार १०७२ नितीन लोखंडे, पोलीस हवालदार १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १७२२ गणेश कोकणे व पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर यांच्या पथकाने सलग दोन दिवस कुर्ला, मुंबई व अंबरनाथ, ठाणे या परिसरात शिताफिने तपास करुन आरोपी नामे १ कामील हुसेन अन्सारी वय ३३ रा. रुम नं ३२ शास्त्रीनगर प्लॉट नं १ निअर ब्रांदा बस टेपो वेस्ट, मुबंई ५० व २. फिरोज नईम खान वय ३३ वर्षे, रा. आंळदी रोड, आंळदी फाटा चाकण पुणे.
यांना ताब्यात घेवुन अटक करुन तपास केला असता. आरोपी क्रं २ याने आरोपी क्रं १ याचे सांगणेवरुन सदरचा गुन्हा केला असल्याचे व सदर गुन्हा केल्यानंतर आरोपी क्रं १ याने सदर गुन्हयातील मोबाईल फोन हे विक्री करीता स्वतः कडे ठेवल्याचे निष्पन्न झाले. आरोपी क्रं १ कामिल हुसेन अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींगचे दुकान असुन सदर आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या महागडया मोबाईल फोन पैकी ११,६८,२७० रुपय किंमतीचे २१ मोबाईल फोन आतापर्यंत जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.
स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड, मा श्री बाळासाहेब कोपनर साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १,, पिं चिं., यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर विक्रांत गायकवाड, सागर शेडगे पो हवा माळी, व पोशि. हुलगे यांनी केली आहे.



