
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २८ नोव्हेंबर २०२३ कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती, पुणे जिल्हा व संयुक्त शेतकरी किसान मोर्चा यांच्या वतिने श्रमिक, कामगार, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या मागण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाटा, कासारवाडी येथे निदर्शने, धरणे, आंदोलन करण्यात आले.


याठिकाणी इटंक, सिटू, आयटक, एच.एम.एस., ए.आय.सी.सी.टी.यु., एन.टी.यु.आय., बी.के.एस.एम., राज्य सरकारी कर्मचारी संघटना, केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, हिंद कामगार संघटना, पीएमपीएमएल कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना इत्यादी संघटनाच्या प्रतिनिधींसह कामगार उपस्थित होते.



