महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६७ व्या महापरिनिर्वान दिनी या “महासागराला अभिवादन करण्यास जन सागर” “भिमसृष्टी” पिंपरीत पोहचला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (अनिरूद्ध चव्हाण व मनिषा पवार ) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन भीम अनुयायी विविध प्रकारे बाबासाहेबांना आजच्या दिवशी आदरांजली वाहत आहेत. सकाळी ९:३० वा. ओप्लांजल फांऊडेशनच्या वतिने बिस्किट व पाणी वाटप करण्यात आले यावेळी राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रा.बी.बी. शिंदे, प्रल्हाद कांबळे, अजित गव्हाणे, युवराज दाखले व इतर ही कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले ज्यात गित गायन व रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतिने एक वही व पेनाचे लोकांकडून दान मागीतले गेले. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने अनेक कार्यक्रम घेण्यात आले.या वेळी संघटनेचे सर्व पदाधीकारी उपस्थित होते. याच प्रमाणे सर्वात महत्वाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 400 जणांनी रक्तदान करत बाबासाहेबांना आदरांजली अर्पित केली. या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दलाचे संघटक मनोज गरबडे व यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात समता सैनिक दलाच्या वतीने ‘ब्लड फॉर बाबासाहेब’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ४०० जणांनी रक्तदान करत बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी आयोजक मनोज गरबडे म्हणाले की, भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते. बाबासाहेबांना अनोखे विज्ञानवादी अभिवादन म्हणून मागील पाच वर्षांपासून समता सैनिक दलाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या रक्तदान शिबीर आयोजनाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे तसेच कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्यांचे मनोज गरबडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!