आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

एक घास कावूचा एक घास चिवूचा तसाच एक घास रुग्णासोबतच्या ताईचा एक घास रुग्णासोबतच्या भाऊचा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ डिसेंबर २०२३ छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने “अटल अन्न छत्र” योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड येथील “यशवंतराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात” या ठीकाणी गेली वर्षभर रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत जेवण (200 + टिफिन) दिले जाते.
आजचे अन्नदान श्री. रवींद्र वैद्य (कुटुंब) यांचे हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना वाटप करण्यात आले. अन्नदान वाटपाचा आजचा दिवस हा ३५१वा असल्याचे छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगीतले. यावेळी छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनचे काही स्वयंसेवक किशन सिंग, वैभव इंगळे, विशाल खारोडे, संतोष अहिरे उपस्थित होते.
यावेळी श्री. रवींद्र वैद्य बोलले की हा अन्नदानाचा कार्यक्रम अगदी स्तूत्य उपक्रम आहे. या टिमचे जितके कौतूक करावे तितके कमीच आहे. छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशनचे असे असंख्य उपक्रम सूरू आहेत
१) अटल अन्न छत्र योजना
२) छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे.
३) गृहिणींना शिलाई मशीन घेवून देणे,
४) वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणे.
५) शेअर बाजार या विषयावर चर्चासत्र लावणे.

असे विविध उपक्रम हे फाउंडेशन राबवत असते. असे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!