
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १७ डिसेंबर २०२३ मासिक पाळी मध्ये महिलांना होणारा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात असतो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सैनिक कडून १२ जून २०१८ रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनामध्ये असे म्हटले होते की आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर देशा प्रमाणे मासिक पाळीमध्ये २ दिवसाची पगारी सुट्टी मिळते त्याच प्रमाणे महिलांना होणारा त्रास हा जाणून घेवून आपण महाराष्ट्रातील नोकरदार महिलांना पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली होती. पण सरकार तळ्यात मळ्यात असल्यामुळे या मागणीचा निर्णय लागला नाही पण आत्ता याच विषयाला बुधवारी राज्यसभेमध्ये केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री माननीय स्मृती इराणी यांनी राज्यसभेमध्ये महिलांच्या मासिक पाळी संदर्भात ज्या पद्धतिने विधान केलं आहे. ते अगदीच चूकीचे आहे त्या बोलल्या की मासिक पाळी आल्याने महिला अपंग होत नाही. त्या मुळे पगारी सुट्टीच्या योजनेची महिलांना गरज नाही असे घाणेरड्या पद्धतीने विधान करणाऱ्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला त्यामध्ये स्मृती इरानी यांची स्मृती भ्रष्ट झाली आहे व त्या खरोखर महिलाच आहेत का असा सवाल त्यांना विचारायला हवा सोबत सर्व महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इरानींच्या फोटोला जोडे मारून राग व्यक्त केला. यावेळी घोषणाही देण्यात आल्या स्मृती इराणी यांच्यासारख्या जवाबदार केंद्रीय मंत्र्यांनी व स्वता एक महिला असून ही असे घाणेरडे वक्तव्य करणं हे त्यांना शोभा देत नाही. तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती करतो की बालकल्याण विकास महिला केंद्रीयमंत्री माननीय स्मृती इराणी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.
एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे स्मृती इराणी सारख्या केंद्रीय मंत्र्यांनी ज्या स्वता महिला असून महिलांबद्दल असं वक्तव्य करणे हे त्यांना कुठेही शोभत नाही ज्या वेदना मासिक पाळीमध्ये महिलांना होतात त्या वेदनेची जाण फक्त एका महिलेला असते पण आज मासिक पाळी आल्यानंतर महिला अपंग होत नाही असे विधान करणाऱ्या स्मृती ईराणी ही पहिली महिला असेल की जिने स्वतः महिला असून देखील देशातल्या महिलांची अब्रू अक्षरशः चव्हाट्यावर मांडण्याचे विधान केले आहे. सत्तेचा माज आलेल्या या स्मृती ईराणी यांनी लवकरात लवकर महिलाची माफी मागावी किंवा त्या पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना या ही पेक्षा तिव्र आंदोलन छेडतील असे मनसे महिला सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सीमाताई बेलापूरकर बोलल्या.
यावेळी मनसे महिला सेनेच्या सर्व महिला कार्यकर्ते व सभासद ॲड. सौ. वैशाली अतुल कोराटे, सौ. रेखा देशमुख, सौ. वैशाली निजामपुरकर, स्वाती प्रदिप पांचाळ, ज्योती सोनवले, विशाखा बनसोडे, सौ. हेमा ननावरे, सौ. वैशाली बोत्रे, सौ. राधा साळुंके उपस्थित होत्या.




