गून्हाविशेषशहर

गुन्हे शाखा युनिट ०२ ची कामगीरी गंभीर गुन्ह्यातील व घरफोडीतील ०९ महिन्यापासून पाहिजे असलेला “इराणी” आरोपीस अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ डिसेंबर २०२३ परवा दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ०२ कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना गोपनिय माहिती मिळाली की आरोपी नामे नादर चंगेस इराणी वय 37 वर्ष रा. गल्ली नंबर आठ हुसेनिया मज्जिद जवळ पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे हा आरोपी भक्ती शक्ती चौक निगडी येथे थांबला असल्याचे कळाले त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता असे समजले की यावर खालील ठीकाणी गून्ह्याच्या नोंदी आहेत.
१) खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १७८ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५
२) माणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२३ भादवि कलम ४५४, ३८०, या गुन्ह्यातील नाव निष्पन्न त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची तोंडी कबुली दिल्याने आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकामी त्यास खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. असे जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०२ पिंपरी चिंचवड यांनी सांगीतले.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!