महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भिमाकोरेगाव शौर्यदिना करिता पी.एम.पी.एल.ची व्यवस्था ठरली भीमसैनिकांना त्रासदायक बस दोन दोन तास येत नाही..

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी चिंचवड दि. ०१ जानेवारी २०२४ भीमसैनिक शौर्यदिना निमित्त मानवंदना देण्यासाठी दरवर्षी भीमाकोरेगाव येथे जात असतात. त्यांची गैर सोय होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी (पिंपरी चिंचवड शहर)च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथून बसेसची व्यवस्था करण्यात यावी अशी PMPL (पी.एम.पी.एल.) चे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे साहेब यांना निवेदना द्वारे विनंती करण्यात आली होती ती त्यांनी मान्य ही केली होती. पण नेहमी प्रमाणे पालथ्याघड्यावर पाणी असेच दिसते आहे मागील वर्षा प्रमाणेच याही वर्षी एक ही गाडी वेळेवर नसल्याने समाज बांधवात नाराजीचा सूर दिसत आहे तरी (पी.एम.पी.एल.) चे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे साहेब यांनी लवकरात लवकर बसेस वेळेत सोडाव्यात अशी मागनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button