आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सार्वजनिक उपक्रमाकरिता पेठ क्र.२४ चा भूखंड राखीव रहावा या मागणीला माझा पाठिंबा राहील-मेधा पाटकर

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०२ जानेवारी २०२४ भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या वतीने पेठ क्र. २४ येथील भूखंड कायमस्वरूपी सार्वजनिक उपक्रमाकरिता राखीव रहावा या मागणीसाठी विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी ही जागा शहराच्या प्रवेशद्वारापासून शेजारी ऐतिहासिक भक्ती शक्तीचे शिल्प आहे. या जागेत तिरंगा ध्वज आहे. समोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे. केवळ मॉल आणि इमारती म्हणजे विकास नाही. तर अशाप्रकारे काही भूखंड सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम साठी लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळे राहिल्याच पाहिजेत. त्यामुळे आपली मागणी योग्य व न्यायप्रिय आहे. राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयाच्या वतीने आपल्या मागणीला मी पाठिंबा देत असून सरकारने मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी प्रतिक्रिया पाटकर यांनी यावेळी दिली. यावेळी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर, सचिन चिखले, प्रसाद बागवे, युवराज गटकर, बी.बी. खंडागळे, ब्रह्मानंद जाधव, युवराज दाखले, सचिन काळभोर, वैभव कुहाडे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button