महाराष्ट्रशहरशैक्षणिकसामाजिक

मुस्लिम आरक्षण व संरक्षण बाबत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन- सालारभाई शेख

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ जानेवारी २०२४ महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेले पाच टक्के आरक्षण पुन्हा एकदा देण्यात यावे. या करिता वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र राज्यच्या वतिने मागणी केली गेली आहे की जे सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिटी यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षण बाबत शैक्षणिक तसेच रोजगार बाबत आरक्षण देण्यात यावे असे सुचित केले होते, तरी महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये 5% आरक्षणाचा कायदा केला होता तसेच या कायद्याला कोर्टाकडून सुद्धा मान्यता होती परंतु सध्याचे विद्यमान महाराष्ट्र सरकारने मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिली, तरी आपण मुस्लिम समाजाला 5% आरक्षणासाठी सर्व शक्यताची पडताळणी करावी, व मागील सरकारने दिलेली 5% आरक्षण पुन्हा देण्यात यावे, यासाठी प्रयत्न करावे, तसेच विद्यमान राज्य सरकारने त्वरित हा आरक्षणाचा कायदा करावा तसेच मुस्लिम समाजसाठी एट्रॉसिटी सारखा मजबूत कायदा करावा, जेणेकरून मुस्लिम समाजावर धार्मिक अत्याचारां मुळे होणारे हल्ले कमी होतील व मुस्लिम समाजामध्ये जे भीतीचे वातावरण आहे ते कमी होईल या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला डीवचन्याचे व त्यांच्यावर हल्ले करण्याचे दुष्कर्म आटोक्यात येईल, म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर पाच 5% मुस्लिम आरक्षण व मुस्लिमांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा करण्यात यावा ही आपणाकडे विनंती.
मा. जिल्हा अधिकारी पूणे यांना निवेदन देते वेळी वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव सालार भाई शेख, उपाध्यक्ष खाजा नदाफ, अमिल सैफी, बाबा नदाफ, जावेद शाह, फ़िरोज तांबोळी, दाऊद नदाफ इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!