आंदोलनमहाराष्ट्रविशेषसामाजिक
गायरान जागेवरील मागासवर्गीय गरीब कुटुंबांची घरे नावावर करा म्हणून लोणी काळभोर येथे बेमुदत धरणे आंदोलन..

प्रतिनिधी लोणी काळभोर दि. २७ ऑक्टोबर २०२५ लोणी काळभोर येथील गायरान जागेवरील मागासवर्गीय गरीब कुटुंबांची घरे नावावर करणे तसेच रामदरा रस्ता भूसंपादन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे या प्रमुख मागण्या संदर्भात लोणी काळभोर येथील बाजार मैदान या ठिकाणी नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन आज पासून सूरू झाले.
या ठिय्या आंदोलना वेळी राजेंद्र साळवे, प्रीतम सावंत, सुभाष साळुंखे, निखिल काळभोर, रमेश घाडगे, रूपाली काळभोर, दिपाली घाडगे, अनिता साळुंखे, भारती काळभोर तसेच असंख्य लोणी काळभोरकर नागरिक सहभागी झाले होते…
आंदोलन दररोज सूरू राहिल जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत आंदोलन थांबनार नाही. असे आयोजकांनी यावेळी सांगीतले.
आयोजक अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती
मांजरीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी यावेळी सांगीतले.



