
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ मार्च २०२५ पुणे जिल्ह्यातील प्लंबिंगचे काम करत असलेल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी पिडिलाइट इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे.
याच्या अंतर्गत पीडीलाईट-एम सील कंपनीकडून पिंपरी चिंचवड शहरात एम सील मास्टर क्लब स्थापन केला आहे. त्याच्या अध्यक्षपदी राहुल धनवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी कंपनीकडून पराग दास, गौरव जायसवाल, अरुण गुप्ता, योगेश पाटील यांनी राहुल धनवे, सोमनाथ जमाले यांना नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी सभेला सत्तर पेक्षा अधिक प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
या क्लब द्वारे सामाजिक काम केली जाणार आहेत. सर्व प्लंबर कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी एकमेकांना रंग लावून होळीचा सण साजरा केला.
तसेच सर्व प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरस एकत्रित असतील तर जास्तीत जास्त चांगल्या सेवा या ग्राहकांना मिळणार आहेत.



