आंदोलनदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पिंपरी येथे बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यच्या वतीने EVM बंदची हाक-राजेंद्र पवार

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी चिंचवड दि. १२ जानेवारी २०२४ देशात घेतल्या जाणार्‍या निवडणूका या EVM मशीनच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. मात्र या EVM वर सर्व स्थरातून होत असलेला विरोध पाहून काल पिंपरी भिमसृष्टी येथे बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यच्या वतीने EVM बंदची हाक देण्याकरिता आंदोलन करण्यात आले. EVM वर आता सर्व स्तरातील लोकांचा विश्वास राहिला नाही म्हणून येणार्‍या सर्व निवडनूका या लवकरात लवकर EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या असे आंदोलना दरम्यान राजेंद्र पवार यांनी बोलले. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार, महाराष्ट्रप्रदेश प्रभारी श्रीकृष्ण वाघ, महा.प्रदेश सचिव अमर माने, योगेश आहिरे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सुर्यवंशी, उपाध्यक्ष अशोक वानखडे, शहर अध्यक्ष राहुल रोकडे, कार्याध्यक्ष महेश कांबळे, पिपरी विधानसभा अध्यक्ष राज जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष संजय गोफनारायन, सामाजिक कार्यकर्ते पॅन्थर दत्ताभाऊ गायकवाड, प्रा.बी.बी.शिंदे, रंजित घोबाडे, अदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!