तडीपार आरोपीस गावठी कट्टयासह अटक एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जानेवारी २०२४ परवा दि.१४/०१/२०२४ रोजी ००/३५ वाजण्याचे सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक तरंगे, पोहवा १०२२ दातार व पोशि १३१९ खांबट असे वन मोबाईलवरुन हवालदार वस्ती मोशी पुणे भागात रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना आम्हास बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, तडीपार इसम नामे करण कुमार जाधव हा एका रिक्षा क्रमांक एमएच १४ / एचएम / ६४४९ मधुन पिस्टल घेवुन सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही मोशी मार्शलवरील पोशि हंबर्डीकर यांना फोन करुन बोलावुन घेवुन आम्ही पंच व मार्शलसह पेट्रोलिंग करुन रिक्षाचा शोध घेत असताना सदरची रिक्षा सिल्व्हर लक्ष सोसायटी मोशी पुणे समोरील खदानचे कच्च्या रस्त्यावरुन जात असताना दिसल्याने सदरची रिक्षा पाठलाग करुन थांबवुन त्यातील दोन्ही इसम खदानचे दिशेने अंधाराचा फायदा घेवुन अंधारात पळुन जाऊ लागले असता पळुन जाणाऱ्या इसमांपैकी एकास पाठलाग करुन स्टाफचे मदतीने शिताफीने ०१/१५ वा पकडुन ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता करण कुमार जाधव वय २६ वर्ष रा. लक्ष्मीनगर (दक्षिण) पाण्याच्या टाकीजवळ, मोशी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही ताब्यात असलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक पिस्टल व एक जिवंत राउंड मिळुन आला. तेव्हा त्यास त्याचे पळुन गेलेल्या साथीदाराचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता राहुल रा. खडी मशीन रोड, मोशी पुणे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीवर यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ७४/२०१२ भादंवि कलम ३९९ ४०२
२) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ३०२/२०१६ भादंवि कलम ४५४ ३८०
३) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ३०३/२०१६ भादंवि कलम ३९२, ३४
४) भोसरी पोलीस ठाणे – गुरनं २९४/२०१६ भादंवि कलम ४५४, ३८०
५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे – गुरनं ११३/२०१७ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
६) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २११/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
७) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २१/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
८) निगडी पोलीस ठाणे – गुरनं ३४/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
९) निगडी पोलीस ठाणे – गुरनं २२७/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४
१०) निगडी पोलीस ठाणे, गुरनं २८३/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
११) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गुरनं.३५/२०१८ भादवि कलम ३७९, ३४
१२) चाकण पोलीस ठाणे, गुरनं ४०९/२०१८ भादंवि कलम ४५७, ३८०, ३४
१३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं १३६/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४
१४) पिंपरी पोलीस ठाणे – गुरनं ६५/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४
१५) पिंपरी पोलीस ठाणे – गुरनं ९३/२०१८ भादंवि कलम ३७९, ३४
१६) चाकण पोलीस ठाणे, गुरनं १६१ / २०२० भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४९ म.पो.अधि.३७ (१) १३५
१७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं ४२८/२०२१ भादंवि कलम ३९२, ३६५, ३४
१८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गुरनं २८०/२०२२ मुंबई अॅक्ट कलम १४२
१९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुरनं ३७३ / २०२२ मुंबई अॅक्ट कलम १४२, आर्म अॅक्ट ४ (२५)
म.पो.अधि.३७ (१) १३५
२०) भोसरी पोलीस ठाणे, गुरनं ६३० / २०२२ भादवि कलम ३८०
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सोो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे सोो, पोलीस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, मा. संदीप डोईफोड सोो, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पिंचिं, मा. डॉ. शिवाजी पवार सोो, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -३, पिंपरी चिंचवड मा. डॉ. विवेक मुगळीकर सोो, सहा. पोलीस आयुक्त, एमआयडीसी भोसरी विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र निकाळजे सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, श्री. अशोक तरंगे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अमोल दातार, जयदीप खांबट, पोशि हंबर्डीकर, व पोशि देवकर यांनी मिळुन केली आहे.



