महाराष्ट्रशहरशुभेच्छासामाजिक
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या महीला आघाडी पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी कविता शिवलाल परमार यांची नियुक्ती जाहीर..

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. २२ जानेवारी २०२५ शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कालवले यांच्या समवेत शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सीमाताई भालेराव व मुख्य कार्यालयीन सचिव कल्पना मोरे (दाखले )यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी सौ. कविता शिवलाल परमार यांची नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष युवराज दाखले यांनी शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
यावेळी नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी पिंपरी विधानसभा अध्यक्षा कविताताई परमार यांनी सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग महिला माता-भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची विनंती वजा सूचना दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



