भारतीय बौद्ध महासभेच्या गेवराई तालुका संरक्षण सचिव पदी अतुल सुर्यवंशी यांची निवड..

प्रतिनिधी गेवराई दि. २४ जानेवारी २०२४ गेवराई शहरातील संघमित्रनगर या ठिकाणी धम्मदीप बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या निमित्ताने व्ही. एन. निसर्गंध मराठवाडा विभागीय सचिव, सिद्धार्थ जगझाप बीड जिल्हा सचिव, राजाभाऊ आठवले समता सैनिक दल कमांडर, अमरसिंह ढाका समता सैनिक दल, रुक्मिणी शिंदे समता सैनिक दल, यांच्या उपस्थितीमध्ये गेवराई तालुका नवीन कार्यकारणी जाहीर केली. त्यात प्रामुख्याने तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, संस्कार उपाध्यक्ष, संरक्षण उपाध्यक्ष, पर्यटन प्रचार व प्रसार सचिव, संस्कार संरक्षण पर्यटन व प्रचार प्रसार तालुका संघटक व तालुका सदस्य या पदावर अनेक नवीन चेहऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
यात तालुका अध्यक्ष-अनिल बोराडे, सरचिटणीस-बांगर सुभाष, कोषाध्यक्ष-विजय निकाळजे यांची निवड करण्यात आली. जिल्हा सचिव सिद्धार्थ जगताप यांनी सर्वांना पदाची जबाबदारी सांगून चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या व आपली जबाबदारी समजावून सांगितली. यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



