गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

दरोडा घालणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना २४ तासात अटक वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झालेने मा. श्री. विनयकुमार चौबे सारे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना गुन्हेगारी वृत्तीचे इसमांना ताब्यात घेवुन योग्यती कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत देखील मालमत्ता व शरीराविरुध्दच्या गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुध्द् सावर्डे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना गुन्हेगारी वृत्तीचे लोकांवर लक्ष ठेवून बेकायदेशीर कृत्य करीत असताना मिळुन आलेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले.
फिर्यादी नामे अक्षय विलास केदारी, वय २८ वर्षे, धंदा व्यवसाय, पत्ता- पवारनगर, लेन नं. ०१, गुडलक मटणच्या शेजारी, काका वडापाव शेजारी, थेरगाव, पुणे यांनी पोलीस स्टेशन मध्ये हजर होवुन फिर्याद दिली की, बुलेट व ॲक्टिव्हा तसेच गाडयांवर हातामध्ये पिस्टलसारखे हत्यार, कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या घेवून बेकायदेशीर एकत्र येवुन ते हवेत फिरवुन आजुबाजुच्या राहणारे लोकांमध्ये दहशत निर्माण करुन त्यांचेकडे असलेल्या बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडुन, रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व वेस्पा गाडी कोयत्याने फोडुन नुकसान करुन माझे खिशातील १६०० रुपये, मित्र यश सपकाळ याचे खिशातील १२०० रु व मित्र अजय नवले याचे खिशातील ७०० रुपये असे एकुण मिळुन ३५००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन धमकी देवुन आमचे परिसरात दहशत निर्माण केली आहे अशा मजकुरची तक्रार दाखल केली.
सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि अनिरुध्द् सावर्डे यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे पोउपनि सचिन चव्हाण व पोउपनि अनिरुध्द् सावर्डे यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा दाखल होताच अवघ्या ०६ तासाचे आत एकुण १२ आरोपींना अटक केली त्यापैकी ०८ आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींची पोलीस कोठडी मंजुर करुन घेणेकरीता आरोपींना मे. कोर्टासमोर हजर केले असून पुढील तपास सपोनि. गायकवाड हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि. अनिरुध्द् सावर्डे, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबिले, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे पोशि. सागर पंडीत (परि – ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!