
प्रतिनिधी पूणे दि. ०२ नोव्हेंबर २०२५ महाराष्ट्र राज्यात मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण महाराष्ट्र राज्य, पुणे. यांचे नियंत्रण व देखरेखीखाली तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली स्थापन झालेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उद्देश अवैध अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक व साठा करणारे यांचेवर कडक कायदेशिर कारवाई करुन अवैध अंमली पदार्थाच्या व्यापारास आळा घालणे तसेच अवैध अंमली पदार्थ सेवनाची सवय लागलेल्या व्यक्तींचे पुर्नवर्सन करणे तसेच अंमली पदार्थाच्या वापराचे दुष्रिणामबाबत व्यापक जनजागृती करणे असा आहे.
दिनांक २८/१०/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरातील हडपसर, वानवडी, काळेपडळ भागात पेट्रोलींग करीत असताना मांजरी ते १५ नंबर चौक रोड इंण्डेन गैस शेजारी पाकींग जवळ रोडचे कडेला हडपसर पुणे या ठिकाणी दुचाकीवर एक महिला व एक तृतीयपंथी हे संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव १) मेघा दिपक जगताप वय २७ वर्षे रा. बी/०३, उमेश स्मृती महादेव नगर, मांजरी रोड, हडपसर, पुणे. २) (तृतीयपंथी स्नेहल उर्फ गणेश शिवांब बाचे वय २१ वर्षे रा. पॅराटाइज सोसायटी, काळुबाई लेन नंबर १, ससाणेनगर रोड, हडपसर, पुणे. असे सांगितले तसेच पंचासमक्ष घेण्यात आलेल्या अंगझडती व घरइडती दरम्यान सुमारे ३,००,४००/- रुपये किमतीचा सुमार ६० ग्रॅम ०८ मिली वजनचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ, वजन काटा ०२ मोबाईल व टीव्हीएस ज्यूपीटर गाडी असा एकूण ४,३१,९५०/-रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून पंचासमक्ष मुद्देमाल जागीच सील करून ताब्यात घेण्यात आला. सदरचा मेफेड्रॉन (एमडी) हा कोठून आणला याबाबत महिला आरोपी मेघा जगताप हिने आरोपी क्र ०३) सलमान रालीम शेख रा. घोरपडे पेठ, उदयानाजवळ, त्रुप्ती निवारा, किर्लोराकर कॉलनी, महादेव नगर, गांजरी रोड, हडपसर, पुणे. याचेकडून आणल्याचे सांगितले असता त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी पांचे विरुदध हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ९१६/२०२५ एन.डी.पी.एस ॲक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिन्ही आरोपीना कायदेशिर कार्यवाही करुन अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेमा पाटील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभाग, पुणे या करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस महासंचालक, सुनिल रामानंद साो, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक, प्रविण पाटील, पोलीस अधीक्षक (कृती) एम.एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक उमेश तावसकर, पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेमा पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती सरोजनी चव्हाण, सपोनि माधवानंद धोत्रे, सपोफी पास्ते, पो.हवा. बोमादंडी, पो.हवा, बंद्रे, पो.हवा, गवळी, पो.हवा. इंगुळकर, म.पो.हवा. ढेबे, म.पो. अं. कोळेकर नेमणुक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभाग, पुणे, तसेच हडपसर पोलीस ठाणे कडील पोउपनि हसन मुलाणी, पोउपनि सत्यवान गेंड व स्टाफ यांनी उष्कृष्टरित्या पार पाडली आहे.
यावेळी नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध अंमली पदार्थाची विक्री, साठा, वाहतुक किंवा तस्करीच्या अनुषंगाने कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे विभागाच्या खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा. संबधित माहिती देणारे व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक गोपनीय ठेवण्यात येईल,
१. नियंत्रण कक्ष व्हाटसॲप क्रमांक 721800073
२. नियंत्रण कक्ष टेलीफोन क्रमांक 020-29991084
३. ई-मेल आयडी spantf-puncit mahapolice.gov.i



