आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविषयी भीमशाही युवा संघटनेच्या वतीने प्रशासकांना लेखी निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २६ डिसेंबर २०२३ विठ्ठलनगर नेहरूनगर पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्थानिक मा. नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांना भीमशाही युवा संघटनेच्या वतीने आज आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराविषयी लेखी निवेदन देऊन कळवण्यात आले. विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी आयुक्तांनी पाहणी करावी अशी विनंती ही करण्यात आली. विठ्ठलनगर नेहरूनगर पुनर्वसन प्रकल्पामध्ये एकूण १३ इमारती आहेत. पण या इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असतात यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत आहे तसेच दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी ॲपवर अनेकदा तक्रारी करून देखील सारथी ॲपद्वारे व आरोग्य विभागाच्या संबंधितांना यासंदर्भात वेळोवेळी कळवून देखील कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे तसेच पुनर्वसन प्रकल्पामध्ये बीव्हीजीच्या कचरा उचलणाऱ्या गाडी वरील कामगारांकडून कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने काल पालिका आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. या प्रकरणी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालावे अन्यथा भीमशाही युवा संघटनेच्या वतीने आयुक्तांच्या दालनामध्ये कचरा टाकुन निषेध करणार असल्याचे भिमशाही युवा संघटनेच्या वतीने आज लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी शिवशंकर उबाळे नितीन कसबे अनिल सुरवसे प्रवीण धाईजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





