महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंगचा महापूर सुरुच..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ ऑक्टोंबर २०२३ तुषार कामठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आणि संघटना बांधणीची चक्रे जोरात फिरू लागली. कामठे यांनी रोहित दादा पवार यांना पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घालायची गळच जणू घातली आहे. त्यात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही पिंपरी चिंचवड शहरात दोनदा भेट देउन वैयक्तिक लक्ष द्यायला सुरवात केली आहे.
आज चिंचवडचे जेष्ठ माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे चिरंजीव उद्योजक सागर मधुकर चिंचवडे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थित प्रवेश केला.
२०१७ च्या निवडणूकीमध्ये चिंचवडे यांच्या पत्नीने शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
जेष्ठ्याचे आशीर्वाद घेऊन तरुण फळी शरद पवार यांच्यासोबत येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. यावेळी ॲड. दिनेश भोईर, ऋतुज चिंचवडे, प्रवीण चोरडिया, प्रकाश धस व इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, प्रवक्ते रविकांत वरपे, सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, काशिनाथ जगताप, मयूर जाधव, प्रशांत सपकाळ, बापू सोनावणे, अमित तलाठी आदी उपास्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!