महापालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २६ जानेवारी २०२४ ज्या संविधानाने सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मुल्ये दिली त्या संविधानाचा सन्मान करण्याचा आज दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयाला या सणाचा अभिमान असायला हवा. हा प्रजासत्ताक दिन आपल्या भूतकाळाचा अभिमान, आपल्या वर्तमानकाळातील जबाबदारी आणि आपल्या भविष्याची आशा या भावनेने साजरा करूया, या प्रवासात पुढे जात असताना स्वातंत्र्य आणि समतेची मशाल घेऊन जाऊया, जेणेकरून आपल्या लोकशाहीची ज्योत भावी पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी नागरिकांना शुभेच्छा देताना आयुक्त सिंह बोलत होते.
या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास मोलाचे योगदान देणाऱ्या विद्युत विभागातील कर्मचारी, वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्सेस तसेच वॉर्डबॉय, आया, लिफ्टमन, सफाई मित्र, शिपाई, उद्यान विभागातील कर्मचारी आणि वाहनचालक अशा विविध विभागातील एकूण ७५ कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून आणि आयुक्तांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे, नामदेव ढाके,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता रामदास तांबे,श्रीकांत सवणे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदिप खोत, मनोज लोणकर, मिनीनाथ दंडवते, निलेश भदाणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, बाळासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, कर्मचारी महासंघाच्या चारूशीला जोशी, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
तसेच महानगरपालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सामूहिक राष्ट्रगीतानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मनिषा निश्चल, सतिश इंगळे,मौतुषी दास,वंडरबॉय पृथ्वीराज इंगळे,प्रिती बिजवे, किरण अंदुरे यांनी “सारे जहाॅ से अच्छा, ऐ मेरे वतन के लोगो, संदेसे आते है, सुनो गौर से दुनिया वालो ” यासारखे अनेक देशभक्तीपर गीते सादर केली.