प्रतिनिधी पूणे ७५वा प्रजासत्ताक दिन इंदिरा कल्याण केंद्रा तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजरोहन खडकी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. मनीष सुरेंद्र आनंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दीना निमित्त लहान मुलां साठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांना आकर्षक पारितोषिक कसबा मतदार संघांचे विद्यमान आमदार मा. श्री रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमात खडकी छावणी परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष मा. दुर्योधन भापकर तसेच काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष खडकीचे भारत ठाकूर, बोपोडी विभाग ब्लॉक उपाध्यक्ष काँग्रेस नाईम शेख यांचीही उपस्तिथी होती. कार्यक्रमाला पुढील सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली मा. श्री. अनिल सोनावणे, सौ. अश्विनीताई सोनावणे, सौ. मायाताई तांबे, श्री. अनिल दवंडे, मा. जाफर चौधरी तसेच मराठी चित्रपट अभिनेता सोहेल कुरेशी यांनीही आपली उपस्तिथी नोंदविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील तुंगतकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष समीर चौधरी, मा. अध्यक्ष अझहर खान, झहीर शेख, महेबूब पिरजादे, हारून सय्यद, नासिर कुरेशी, सोहेल सय्यद, असिफ पिरजादे, असिफ चौधरी, सचिन गंद्रे, शानवाज कुरेशी, असद मुजावर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी ही कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.
Related Articles
Check Also
Close