गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

साडेअकरा लाखांचा घरात साठवलेला प्रतिबंधित पानमसाला केला जप्त एकास अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जानेवारी २०२४ देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी दि. २३ जानेवारी २०२४ सायं. ०६:३०च्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी केली संयुक्तपणे कारवाई ..
विक्रीसाठी घरात साठवलेला ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली. देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी दि. २३ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
रियाज अजीज शेख (४५, रा. मेन बाजार, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी याप्रकरणी बुधवारी दि. २४ देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज याने विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला साठवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा पानमसालाचा साठा जप्त केला. पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!