प्रतिनिधी पिपंरी चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२४ पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने मा.पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा.पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, श्रीमती स्वप्ना गोरे सो सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री. बाळासाहेब कोपनर सो यांनी वारंवार होणा-या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरी बाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.
श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्ही द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी सापळे लावुन व मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली.
दिनांक २६/०१/२०२४ रोजी श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस अंमलदार सपोफौ बोयणे, पो हवा ८३१ खरात, पोशि २३८० नरवडे, पोशि २२१९ खाडे, पोशि २६३४
गोपी, पोशि २४४४ जाधव यांनी मोटारसायकल चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच सापळे लावुन आरोपी नामे मोहमंद राशीद शाहीद शेख वय २० वर्षे, धंदा-वाशिंग सेंटरवरकामास रा. दिनेश पाटील यांचे वांशिग सेंटर, डी वाय पाटील कॉलेजच्या बाजुला वल्लभनगर पिंपरी पुणे यास पीएमटीचौक भोसरी पुणे येथून सापळा लावुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व
पिंपरी शिरुर येथून चोरी केलेल्या ०७ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
भोसरी पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी नामे मोहमंद राशीद शाहीद शेख वय – २० वर्षे, धंदा- वाशिंग सेंटरवरकामास रा. दिनेश पाटील यांचे वांशिग सेंटर, डी वाय पाटील कॉलेजच्या बाजुला वल्लभनगर पिंपरी पुणे याचेकडून एकूण ०७ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणून रूपये २,३०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे सो, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त परि १, श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, श्री. बाळासाहेब कोपनर सो, यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गवारे, पोउनि श्री बालाजी जोनापल्ले, पोउपनि श्री. मुकेश मोहारे, सपोफौ बोयणे, सपोफौ चव्हाण, पोलीस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, रमेश भोसले, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, पोशि साळवे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.