प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३१ जानेवारी २०२४ डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कोणतीही चळवळ यशस्वी व्हावी त्या करिता त्या चळवळीचे वृत्तपत्र असणे आवश्यक आहे. वृत्तपत्र नसलेली कोणतीही चळवळ, ही त्या शिकार होणार्या पक्ष्यासारखा आहे.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाने मुखपत्र प्रकाशित केले. त्याचा उद्देश होता समाजाच्या वेदना आणि विद्रोह व्यक्त करता यावा ! हे मुखपत्र त्यावेळी मराठी भाषेत होते!
आम्ही भारत देशामध्ये राष्ट्रीय भाषेत (हिंदी) मासिक म्हणून ते पुन्हा प्रकाशित केले. त्याचा मुख्य उद्देश गरीब आणि शोषितांच्या वेदनांकडे सरकार आणि इतरांचे लक्ष जावे हे मूकपत्र लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसा छान असा प्रतिसाद ही आम्हाला मिळतो आहे.
काल सायंकाळी “मूकनायक” वर्धापन दिन नियोजन समितीची शेवटची बैठक झाली यात ३१ जानेवारीला होणार्या वर्धापन दिनाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली प्रमूख पाहूणे डॉ. संग्रामजी पाटीलजे इंग्लंड मधून ऑनलाइन उपस्थित असतील, प्रो. लक्ष्मणजी यादव, कमलेशजी सुतार लोकशाही न्युज चॅनलचे संपादक, तसेच किरणजी सोनवणे मॅक्स महाराष्ट्र चॅनल हे प्रमूख वक्ते असनार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत साळवे दादा असणार आहे. प्रमूख उपस्थितीमध्ये हुलगेश चलवादी, डॉ. भीमराव सरवदे (औरंगाबाद) असणार आहेत तसेच पिंपरी चिंचवड मधिल सर्व पत्रकार संघांच्या अध्यक्षांना सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे याच सोबत इतर ही सन्मान यावेळी होणार आहेत तसेच गीत गायनाची जवाबदारी शाहिरी जलसाच्या माध्यमातून
अनिरुद्ध सूर्यवंशी / भरत बाबू लोणेरे यांनी स्विकारली आहे.
मूकनायक वर्धपन दिन नियोजन समिती सर्व कामकाज पाहणार आहे. यात सुधीर जावळे, देवेंद्र तायडे, सुलक्षणा शिलवंत/ धर, राजन नायर, मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, राजेंद्र पवार, युवराज टिकते, शिवशंकर उबाळे, आनंद कांबळे, धर्मराज फडतरे, गोपाल मोरे, संतोष मोरे, नीलेश जाधव, नागपूर संघ : सुधाकर मेश्राम, संजय रामटेके, धनराज बोरकर, नाशिक संघ : रेणुका गायकवाड/महाले, बारामती संघ : प्रशांत सोनवणे असनार आहेत असे मूकनायकचे संपादक व निमंत्रक तुषार गायकवाड यांनी यावेळी सांगीतले.