गून्हाविशेषशहरसामाजिक

नवीन खडी मशीन रोड लगत अमोल पवार या यूवकाचा दगडाने ठेचून खून..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ फेब्रूवारी २०२४ मोशी नवीन खडी मशीन रोडवरील मोकळ्या जागेत भरदिवसा एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारी १२:३०च्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील नवीन खडी मशिन रोडवरील मोकळ्या जागेत एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दूपारी दोनला भोसरी midc पोसिस स्टेशनला माहिती मिळाली. की एक व्यक्ती रक्ताचे थारोळ्यात मोशी कडील कचरा डेपो जवळच असलेल्या पत्राशेड शेजारी पडला आहे. दगडाने ठेचून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमोल पवार हा शांतीनगर ३ नं. वसाहतीत वास्तव्यास होता व्यवसायाने तो रिक्षाचालक होता पण बरेच दिवस तो रिक्षावर जात नसल्याचे नातेवाईक सांगतात आज दूपारी तिन मित्रांन सोबत बाहेर चाललो आहे. असे सांगून तो बाहेर गेल्याचे त्याचे बंधूनी सांगीतले. त्याला पत्नी व लहान मूलगा आहे. पूढील तपास सूरू आहे असे पोलिसांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!