गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

दरोडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी खुनाच्या गुन्हयातील ०३ आरोपी केले जेरबंद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ फेब्रूवारी २०२४ तिन दिवसांन पूर्वी दिनांक ०५/०२/२०२४ रोजी ९० फुटी रोड, कचरा डेपो समोर, मोशी पुणे येथे इसम नामे अमोल पवार नावाच्या इसमाचा खून झाला असून त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६५/२०२४ भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून दाखल गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलीस हवा १६७४ शेडगे व पोशि २६४३ सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एमआयडीसी भोसरी परिसरात ९० फुटी रोड, कचरा डेपो समोर, मोशी पुणे येथे झालेल्या अमोल पवार याचे खुनाच्या गुन्हयातील आरोपी हे एमएच १४ जेपी २४३९ या रिक्षामध्ये बसून चाकणच्या दिशेने जात आहेत. अशी बातमी मिळताच पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार असे मिळून चाकणच्या दिशेने जात असताना लांडगेनगर भोसरी पुणे येथे आले असता वरील नंबरची रिक्षा पुणे नाशिक रोडच्या कडेला थांबलेली दिसली. त्यावेळी स्टाफच्या मदतीने रिक्षा चालकास ताब्यात घेवून त्यास नाव पत्ता विचारता प्रशांत सुधाकर कांबळे वय १९ वर्षे रा. अमोल गुळवे याचे रुम मध्ये भैरवनाथ मंदीराशेजारी गुळवे वस्ती भोसरी पुणे. असे असल्याचे सांगितले त्याचे कडे ९० फुटी रोड, कचरा डेपो समोर मोशी येथे झालेल्या अमोल पवार याचे खुनाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की माझे मित्र नामे शुभम बावीस्कर व विजय फडतरे असे मिळुन अमोल पवार याचा खुन केला आहे व शुभम व विजय हे आत्ताच नारायणगावच्या दिशेन गेले आहेत. असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे जवळील रिक्षा दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. व प्रशांत सुधाकर कांबळे यास दरोडा विरोधी पथकातील स्टाफ यांचे ताब्यात देवुन आम्ही उर्वरीत स्टाफ सह शुभम बावीस्कर व विजय फडतरे यांचा शोध घेणे कामी आम्ही मा. वरिष्ठांच्या तोंडी परवानगीने नाशिकच्या दिशेने रवाना झालो. आम्ही नारायणगाव येथे आलो असता वरील स्टाफच्या मदतीने नारायणगाव परीसरात त्यांचा शोध घेत असताना आम्हांला नारायणगाव बस स्टॅड समोरील रोड वर दोन इसम संशयास्पद उभे असुन त्याचे अंगावरील रक्ताचे डाग दिसले तेव्हां आमची खात्री झाली की वरील दोन इसम हे शुभम बावीस्कर व विजय फडतरे हे असल्याची शक्यता असल्याने त्यांना स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले असुन त्यांना नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १. शुभम अशोक बावीस्कर वय २३ वर्षे रा. बाबा मंगल कार्यालय शेजारी आशा लांडगे यांचे रुम मध्ये धावडे वस्ती भोसरी पुणे. २. विजय उमेश फडतरे वय २२ वर्षे रा. मोशी टोल नाका गायकवाड वस्ती मोशी पुणे. असे असल्याचे सांगितले त्याचे कडे ९० फुटी रोड, कचरा डेपो समोर मोशी येथे अमोल पवार याचे झालेल्या खुनाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा खुन त्यांचा मित्र नामे प्रशांत सुधाकर कांबळे वय १९ वर्षे रा. अमोल गुळवे याचे रुम मध्ये भैरवनाथ मंदीराशेजारी गुळवे वस्ती भोसरी पुणे. याचे मदतीने केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील चौकशी कामी दरोडा विरोधी पथक कार्यालयात आणुन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मिळुन सदरचा खुन केल्याचे कबुल केले.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री डॉ. विवेक
मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश सावंत, सुमित देवकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!