वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवडचा स्तुत्य असा “एक दिवस शाळेसाठी” हा साप्ताहिक उपक्रम..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ फेब्रूवारी २०२४ पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक शाखेचे प्रत्येक प्रभारी अधिकारी यांनी आपआपले विभागामध्ये महिन्याच्या दर आठवडयामध्ये दर गुरूवारी “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकुण २० टिमच्या माध्यमातुन दर गुरूवारी २० शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात विषयी माहिती, व्यसनाधिनतेपासुन दुर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर, स्त्रीया व मुली यांचा सन्मान करणे इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आज दि. ८/०२/२०२४ रोजी वाहतूक शाखेमार्फत दाहव्या टप्प्यात एकुण १८ टिमच्या माध्यमातुन निवडलेल्या १८ शाळांमधुन सुमारे ३६६० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकुण दहा टण्यामध्ये ५०८२१ विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणुस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.
वरील उपक्रम मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड श्री. भास्कर डेरे सहायक पोलीस आयुक्त १ वाहतूक शाखा, श्री. सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त २ वाहतूक शाखा व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व
अधिनस्थ अंमलदार यांचे वतिने आज दि. ८/२/२०२४ रोजी यशस्वीरित्या पार पडला. उत्सफुर्त प्रतिसाद मिळणा-या या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. असे यावेळी सांगण्यात आले.