मनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० फेब्रूवारी २०२४ बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येस दीपोत्सव, फुलांची आरास व आतिषबाजी करून त्याग मूर्ती माता रमाई यांना एक अनोखे अभिवादन करण्यात आले यावेळी समितीचे सर्व सदस्य आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीक उपस्थित होते.
दि. ०७ फेब्रूवारी २०२४ रोजी विश्वरत्न डॉ: बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर व बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागील नियोजित त्यागमूर्ती माता रमाई यांच्या होणाऱ्या स्मारकातील जागेवरती विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन ही जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजनाताई गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला व बुद्ध वंदनेने कार्यक्रमात सुरुवात झाली.
या नंतर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा. आद. जगदीश ओहोळ सर आद. विशाल लोंढे सर (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे ) कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजनाताई गायकवाड यांनी त्याग मूर्ती माता रमाईच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पुस्तक बाप माणूस या पुस्तकाचे लेखक प्रा. आद जगदीश ओहोळ सर यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता जीवनावर सुंदर असे व्याख्यान सादर केले व माता रमाईंना त्याग मूर्ती असे का म्हटले जाईल जाते हे सर्वांना समजावून सांगितले.
या नंतर आद. विशाल लोंढे सर (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांनी देखील शिक्षणाविषयी महत्त्वपूर्ण सुंदर अस मार्गदर्शन केल व अंजनाताई गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रियाताई शेख यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे आभार मानले व पहिले सत्र समाप्त झाले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.आद. मूबीन तांबोळी सर यांनी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. व याच वर्षापासून सुरू करण्यात आलेला पहिला त्याग मूर्तीमाता रमाई गौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातील आद. द्वारकामाई कुडुक यांना प्रत्येक गावांमध्ये बाबासाहेबांचे विचार पोहोचवल्या बद्दल व शिक्षणाचं महत्त्व सर्व समाज बांधवांना व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल व हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात पुणे जिल्ह्यातील ख्यातनाम गायक आद: अनिरुद्ध सूर्यवंशी व संच यांनी सुंदर अशा गीत गायनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या वेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आद. संकल्प गोळे आद. धीरज वानखेडे यांनी सुंदर अशी रमाईंच्या जीवनावरील गाणी गाऊन सर्व उपस्थितांन समोर आपल्या गाण्यातून सुमधुर आवाजातून त्याग मूर्ती माता रमाईंचे कार्य गीतातून सादर केले.
या कार्यक्रमास सर्व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सुंदर असा प्रतिसाद दिला
या वेळी आद. मानव कांबळे सर , चंद्रकांता ताई सोनकांबळे, देवेंद्र तायडे, लक्ष्मण रोकडेसर वरिष्ठ पत्रकार मूकनायक, मंदाकिनीताई गायकवाड, प्रियाताई शेख, कौशल्या गजभार, साधनाताई मेश्राम, बाळासाहेब रोकडे, गोविंद गाडे दादा, विशाल कांबळे, नितीन गवळी, विजय ओहाळ, दशरथ ठाणांबिर, बापूसाहेब गायकवाड, विनोद गायकवाड, राजू साळवे, मनोज गजभार, संतोष शिंदे, मिलिंद घोगरे, महायान मसुरे, राजू भालेराव, रवी कांबळे, राहुल कांबळे, दत्ता गायकवाड, विशाल पवळ, विजय गायकवाड, प्रणव ओव्हाळ, उमेश शिनगारे, बापू वाघमारे, प्रकाश इंगळे, प्रमोद शेरे, राजेंद्र पवार, उषा वाघमारे, प्रज्ञाताई इंगळे, सुजाता बनसोडे,नितीन गायकवाड, तुषार बागडे, सुधाकर सदाफुले, विशाल धूळधूळे, नितेश सरपे, दर्शन कांबळे, सोनू शेळके, इत्यादी समितीचे सदस्य उपस्थित होते व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!