आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महापालिका रुग्णालय तसेच खाजगी वैद्यकीय अधिकारी यांची कायदा व रुग्णालय नोंदणीबाबत चर्चा परिषद संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.- ११ फेब्रुवारी २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी आपल्या रुग्णालय तसेच दवाखाने यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. सध्या महापालिकेकडे ६१७ रुग्णालय व १४५६ दवाखाने यांनी नोंदणी केलेली आहे. सदर नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णालयीन कायद्याची माहिती होणे आवश्यक आहे,खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा तसेच विविध प्रश्नांवर चर्चेतून तोडगा निघावा याकरिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ अधिकारी, पास्को संस्थेचे अधिकारी व महापालिका रूग्णालय,दवाखान्यातील तसेच खाजगी वैद्यकीय अधिकारी यांची कायदा व रुग्णालय नोंदणीबाबत चर्चा परिषद (कार्यशाळा) आज आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर सभागृह, येथे आयोजित करण्यात आलेली होती.
सदर प्रशिक्षणास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोरी नलवडे, डॉ.अंजली ढोणे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे-वालावलकर, डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.तृप्ती सागळे, डॉ.शैलजा भावसार, डॉ.ऋतुजा लोखंडे, डॉ.शिवाजी ढगे, वैद्यकीय अधिकारी, डॉ.विजया आंबेडकर, डॉ.अभिजित सांगडे, डॉ.श्रीकांत सुपेकर, डॉ.कल्पना गडलिंकर व मनपाचे वैद्यकीय अधिकारी तसेच २१० खाजगी वैद्यकीय व्यवसायीक असे एकुण ३०० अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळे मध्ये उपस्थितांचे स्वागत डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी केले तसेच डॉ.मंगेश पाटे, सेवानिवृत्त सह सचिव राष्ट्रीय आय एम ए संघटन यांनी रुग्णालय नोंदणी,आग व विद्युत आँडीट यामध्ये येणा-या अडचणी बद्दल उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांनी रुग्णालय नोंदणी बाबत तर अग्निशामक अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी अग्निशमन परिक्षणा बाबत, विद्युत अभियंता अतुल काकड, यांनी विद्युत परिक्षण बाबत,शहर अभियंता मकरंद निकम यांनी बांधकाम परवानगीबाबत आणि ड्रिम डिजायनर अनिकेत बुटाळा यांनी रुग्णालयाची अंतर्गत सजावट करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ.गोफणे यांनी रुग्णालय नोंदणीत सुसुत्रता आणणेकामी मार्गदर्शन केले.
डॉ. वर्षा डांगे-वालावलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!