गून्हापोलिसविशेषशहर

मैत्रिणीने चोरलेल्या दागिन्यांचा २४ तासात लावला शोध हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाची कामगीरी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ फेब्रूवारी २०२४ फिर्यादी नामे दिपक कैलास ढोबळे वय ३६ वर्षे धंदा-नोकरी रा. फ्लॅट नं. ४०२ पार्थउन्नती सोसायटी जोशी वडेवाले पाठीमागे सुसगाव ता. मुळशी जि.पुणे मुळगाव- मु.पो. मराठा गल्ली, कडा ता. आष्टी जि. बिड यांनी तक्रार दिली की, दि. ०५/०२/२०२४ रोजी रात्रौ ०१/३० वा ते रात्रौ ०९/०० वा चे सुमारास फ्लॅट नं. ४०२
पार्थउन्नती सोसायटी जोशी वडेवाले पाठीमागे सुसगाव ता. मुळशी जि. पुणे येथुन कपाटातील लॉकर मधील ४ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इरादयाने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबत हिंजवडी पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीवरुन गु.र.नं. १४५/२०२४ भा.द.वि.क. ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी यातील फिर्यादी व त्यांची पत्नीकडे केलेल्या चौकशीत समजले की फिर्यादी यांचे घरी सदर गुन्हा घडला त्या कालावधीत त्यांच्या पत्नीची मैत्रिण स्नेहा पारीक ही छ. संभाजीनगर येथुन पुण्यात परिक्षेसाठी आली होती त्यावेळी तिला राहण्याबाबत अडचण
असल्याने ती फिर्यादी यांचे घरी राहण्यास आली होती व निघुन जाताना ती अचानक डोके दुखत आहे असा बहाणा करून घरातुन लवकर निघुन गेली होती. त्यामुळे लागलीच फिर्यादी यांच्या पत्नीची मैत्रिण नामे – स्नेहा श्रीकृष्ण पारीक वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं.२२ शेखर सलुनजवळ तिरुमला मंगलकार्यालयाचे समोर छत्रपती संभाजीनगर हीस ताब्यात घेवुन केलेल्या चौकशीत तिने सदरचा गुन्हा केल्याचे सांगुन तिने सदरचे दागिने चोरी करून तिच्या ओळखीच्या इसमांकडे तिचे दागिने आहेत असे म्हणुन ठेवण्यासाठी दिले असल्याचे समोर आल्याने लागलीच सहा. पो. फौजदार नरेश बलसाने, पो. हवा / ८३३ कुणाल शिंदे, पो.कॉ. २४०० दत्ता शिंदे यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे जावुन आरोपीच्या ओळखीच्या इसमाकडे तपास करुन चोरी झालेले २,८२,००० /- रुपये किंमतीचे ४ तोळे ७ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २ श्री. बापु बांगर सो. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग श्री. डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!