
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ फेब्रूवारी २०२४ फिर्यादी नामे प्रतिक रामप्रकाश यादव वय २९ वर्षे रा. शैलेश दगडे चाळ पाटीलनगर बावधन ता. मुळशी जि. पुणे हे दि.०९/०२/२०२४ रोजी रात्री ०८/०० ते दिनांक १०/०२/२०२४ रोजी सकाळी ०८/०० वा. चे दरम्यान ॲन्सुइव्हा सोसायटीचे गेटरवर वॉचमन म्हणुन डयुटी करीत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल चार्जीगला लावला असताना रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने त्यांचा मोबाईल चोरून नेलेबाबत हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १५२/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक यांना बातमी मिळाली की, माण गाव परिसरात एक इसम जुने मोबाईल विक्री साठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने राम गोमारे सहा. पो. निरीक्षक तसेच सोबत सहा पो. उप निरीक्षक बापुसाहेब धुमाळ, पो.हवा/१५७४ नरळे, पोकॉ. २४०१ कांबळे पो. हवा/६९४ शिंदे यांनी माणगावात सापळा रचुन शिताफीने आरोपी पळुन जाण्याचे तयारीत असताना आरोपी नामे रियाज शाहादुल्ला शेख वय- २१ वर्षे, रा. अंबराई कोकाटे चाळ नंदु कोकाटे यांची चाळ किराणा दुकाना शेजारी पाषाण सुतारवाडी पुणे यास दिनांक १०/०२/२०२३ रोजी २१/१० पकडुन त्याचेकडुन सदर गुन्हयातील मोबाईल व इतर ११ मोबाईल असे एकुण २,२८,०००/- रू किंमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच इतर मोबाईल धारकांचा शोध सूरू आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप आयुक्त परि. २, श्री बापु बांगर सो. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग श्री. डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, राजाराम सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.



