आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

श्री. संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती आरोग्य कर्मचार्‍यांच्या वतिने उत्साहात साजरी..

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड दि. १५ फेब्रूवारी २०२४ थेरगाव येथे “श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती” जल्लोषात आनंदी वातावरणात थेरगाव येथील सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने साजरी करण्यात आली, थेरगाव येथील सफाई कर्मचारी आपसात वर्गणी जमा करून सर्व महापुरुषांच्या जयंत्या वर्षभर साजर्‍या करतात त्यात प्रामुख्याने बुद्ध जयंती, सम्राट अशोक जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा फुले जयंती, शाहू महाराज जयंती, आंबेडकर जयंती, संत गाडगेबाबा जयंती, श्री संत सेवालाल महाराज जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, जागतिक महिला दिन, अशा थोर महापुरुषांच्या जयंती आपले सफाई कर्मचारी कवी गायक अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करतात. या कार्यक्रमात सर्व जयंती कमिटी मेंबर अनिरुद्ध सूर्यवंशी, मौला शेख, दावलभाई, हुसेन शहा, आकाश बनसोडे, अक्षय डोळस, सिद्धार्थ सुरवसे, राजू वाघमारे, अमोल साबळे, पवन कुमार मिसाळ, इंडिया भाट, दीपक आढाव, गौतम अडसूळ, नागनाथ नागिले, विष्णू पवार, ज्ञानेश्वर जाधव, अभिमान रणसूरे, शंकर उनवणे, रहमतुल्ला शेख, कार्तिक आयरे, अजय खोकर, दीपक जोगदंड, तुळशीराम भिंगारदिवे, बापू नवगिरे, सुधाकर आवचार, रवींद्र अवचार, खंडू साळवे तसेच अनेक महीला कर्मचारी हे सर्वजण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतात आज दिनांक १५ फेब्रूवारी २०२४ रोजी श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली यामध्ये सेवालाल महाराज जयंती उत्सव कमिटीचे प्रमुख सदस्य, जयचंद चव्हाण, विलास चव्हाण, पांडुरंग चव्हाण, उमेश चव्हाण, कमलाकर चव्हाण, राजू पवार, प्रकाश पवार, विष्णू पवार, यांनी पुढाकार घेऊन श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार दिला. यावेळी आरोग्य कर्मचारी अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी संत सेवालाल महाराजांविषयी माहिती दिली, शेवटी भारतीय संविधान प्रास्ताविकेचं सर्वांनी वाचन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!