गून्हामहाराष्ट्रविशेषशहर

गाडीचे टपावर बसुन स्टंटबाजी करणार्‍या यूवकांवर वाहतूक शाखा पिंपरी चिंचवडच्या वतिने गुन्हे दाखल..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ फेब्रूवारी २०२४ पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष येथे दि. १५/०२/२०२४ रोजी माहिती मिळाली की, एक तरुण हा केएसबी चौक ते निगडी या रस्त्याने एका चारचाकी गाडीचे टपावर बसुन स्टंटबाजी करीत असुन त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचवेळी वाहतूक नियंत्रण कक्ष येथुन आम्ही निगडी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. सपोनि निलेश गायकवाड यांना सदर व्हिडिओबाबत माहिती देवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार सपोनि निलेश गायकवाड निगडी वाहतूक विभाग यांनी सदर व्हिडिओचे लोकेशन काढुन त्याचे गाडी नंबर वरुन त्याचा नाव व पत्ता काबुन सदर तरुणाचे पत्त्यावर जावून त्याची चौकशी करुन सपोनि. श्री. निलेश गायकवाड निगडी वाहतूक विभाग यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून कायदेशिर तक्रार दिली आहे. त्यामध्ये तरुण नामे १) ओंकार कृष्णा मुंडे वय २४ वर्ष रा. कृष्णानगर, पोलीस लाईन निगडी,
२) प्रतिक सुशिल शिंगटे वय २४ वर्ष धंदा कारचालक, रा. चिकण वडापाव साई गार्डनजवळ कृष्णानगर निगडी यांचेविरुध्द चारचाकी कार नं. एमएच-४३ आर ७२७२ या गाडीमधुन सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, हयगयीने निष्काळजीपणे प्रतिक सुशिल शिंगटे यांनी वाहन चालवून व मुलगा नामे ओंकार कृष्णा मुंडे हा गाडीचे टपावर बसुन स्टंटबाजी करुन स्वतःचे जिवीतास व रस्त्यावरील इतर प्रवाशी, वाहनचालक यांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले म्हणुन त्यांचे विरुध्द भोसरी एमआयडीसी पो.स्टे. गु.र.न. ८४/२०२४ भादवि.क.२७९,३३६ मोवाका.क.१८४, १७९/१७७, प्रमाणे दि. १५/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
अशाप्रकारे सार्वजिनक रस्त्यावर चारचाकी / दुचाकी वाहनांवर स्टंटबाजी करुन स्वतःचे व इतर रस्त्यावरील नागरिकांचे जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणा-या तरुणांवर वरील प्रमाणे कारवाई करण्याचे सातत्य राखले जाईल.
सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त मा. श्री. विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी-चिंचवड, यांचे योग्य मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!