अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
विठ्ठलवाडी देहूगावात विठ्ठलनगर नेहरूनगर येथिल तरुणाचा कामकरत असताना विजेचा शाॅक लागून मृत्यू..
प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण देहूगाव दि. २९ फेब्रूवारी २०२४ विठ्ठलवाडी देहूगाव येथील गट नंबर १० येथे दिनांक २७/ ०२ /२०२४ वेळ साधारण दुपारी तीन च्या दरम्यान इलियास शेखलाल शेख वय ३६ राहणार बालाजी हाऊसिंग सोसायटी ए ०५ विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्प नेहरूनगर पिंपरी १८.
विठ्ठलवाडी गट क्रमांक १० देहू गाव या ठिकाणी काम करत असताना विजेचा (विद्युत) शॉक लागला त्यावेळी त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकार्याने त्याला संत तूकाराम नगर पिंपरी येथिल वाय.सी.एम. रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.