महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

“स्लम सॉकर” ही राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धा खेळणार वस्ती भागातील दिशा भरकटलेलीबालके.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ फेब्रूवारी २०२४ मा. श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणा-या दिशा उपक्रम अंतर्गत विधीसंघर्षीत बालक व गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळावी या दृष्टीकोणातुन वस्ती / झोपडपट्टी भागात विशेष बाल पथक, गुन्हे शाखा हे संदेश बोर्डे स्पोटस फाउंडेशन यांचे मदतीने संपुर्ण शहरात क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रममध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील १८ पोलीस स्टेशनकडील एकुण ३५ पोलीस अधिकारी यांनी आपआपले पोलीस स्टेशन हददीत फुटबॉल मैदान उपलब्ध करुन घेवुन एकुण ३१ फुटबॉल टिम तयार केल्या आहेत. व त्यांना संदेश बोर्डे स्पोर्टस फाऊंडेशनचे फुटबॉल कोचचे मदतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पोलीस अधिकारी व कोच यांचेयांचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट फुटबॉल खेळाडुंची निवड करुन नुकत्याच नागपुर येथे पार पडलेल्या “स्लम सॉकर” या महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा टीमच्या मुलांच्या संघाने द्वितीय आणि मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळुन यश संपादन केल्याने मा.पोली आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, पिंपरी चिंचवड यांनी क्रिडा प्रशिक्षकासह सर्व खेळाडुंचे अभिनंदन केले.
तसेच दिनांक २९.०२.२०२४ रोजी पासुन कोलकत्ता येथे होणा-या “स्लम सॉकर” या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने राबविण्यात येणा-या दिशा उपक्रमांतर्गत हद्दीतील एकुण ०२ उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूंची निवड झाल्याने मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडुंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
याप्रसंगी मा. श्री. विनय कुमार चौबे, सोो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सोो, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग (नोडल अधिकारी, विशेष बालपथक), क्रीडा प्रशिक्षक श्री. संदेश बोर्डे व त्यांचे सहकारी कोच, समाजसेविका प्राजक्ता रुद्रवार (रावेत) तसेच विशेष बाल पोलीस पथकाकडील दिशा टीम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!