जातीयवादी केतकी चितळे व ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करा..
प्रतिनिधि गेवराई दि. ०१ मार्च २०२४ परळीत झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत आयोजक व केतकी चितळे या महिलेने अनुसूचित जाती जमातीला बदनाम करण्याचे हेतूने दलितांच्या विरोधात ही परिषद घेतली होती म्हणून जातीयवादी केतकी चितळे वर व आयोजकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी गेवराई महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड व तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उमाप यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे आप्पासाहेब मस्के तालुका अध्यक्ष वाहतूक दत्तात्रेय सौंदरमल जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण उमाप तालुका उपाध्यक्ष भिवा हातागळे तालुका सचिव गेवराई गणेश दिवाण शहराध्यक्ष वाहतूक आघाडी शेख खाजा निजाम गेवराई शहर व तालुका प्रसिद्धीप्रमुख दत्ता वक्ते इसुफ शेख कैलास प्रधान अल्बक्ष शेख भागीरथ गंगाराम परळकर राहुल सौंदरमल, मिर्झा जहांगीर आलि, आलि इराणी इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.