महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्यच्या वतिने पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. राजू पेठे यांची नियुक्ती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ मार्च २०२४ काल गुरुवार दि.२९ फेब्रूवारी २०२४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य. मध्यवर्ती कार्यालय येथे बैठक झाली यात राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. डॉ. तात्यासाहेब उदुगडे पाटील यांच्या शुभहस्ते पूणे जिल्हा अध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून मा. राजू पेठे त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी मा. मनीष भालेकर यांची ही निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. तात्यासाहेब उदुगडे पाटील,
महाराष्ट्र उपाध्यक्ष शांताराम गणेश खुडे, नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा अध्यक्ष राजू पेठे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, मनीष भालेकर तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. तात्यासाहेब उदुगडे पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच नवनिर्वाचितांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. असे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!