महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

‘क’ प्रभागाचे वतिने कुदळवाडी, चिखली येथे अतिक्रमण निष्कासनाची झाली कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०४ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत, प्रभाग क्र. ०२. मधील कुदळवाडी, चिखली ३० मीटर डी.पी. रस्त्यामधील सुमारे २५,००० चौ.फुट क्षेत्रातील ०२ आर.सी.सी. बांधकामे व ०१ वीट बांधकामसह पत्राशेड इत्यादीवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली व रस्ता रुंदीकरण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मनोज लोणकर उपआयुक्त यांचे निर्देशानुसार कारवाई
करणेत आली.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, मनोज बोरसे, नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, किरण सगर, प्रियंका म्हस्के, रचना दळवी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऐश्वर्या मासाळ, केशव खांडेकर, निकिता फ़डतरे, श्रीकांत फ़ाळके, स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई
करण्यात आली.
प्रभाग क्र. ०२ चिखली/कुदळवाडी परिसरातील सुमारे २५,००० चौ.फुट वीट बांधकाम व पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. दि.०४/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नये, तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड/बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!