माता रमाई यांचे स्मारक उभे व्हावे म्हणून पिंपरीचे आमदार मा.आण्णा बनसोडे यांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ मार्च २०२४ कार्यसम्राट आमदार पिंपरी विधानसभा यांना भिमशाही युवा संघटनेच्या वतिने आज निवेदन देण्यात आले. भिमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांनी यावेळी सांगीतले की पिंपरी चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भिमसृष्टी) मागील जागेत त्याग मुर्ती माता रमाई यांचे स्मारक उभे करण्याकरिता गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना व समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे निवेदने आंदोलन, मोर्चा, उपोषणाच्या, माध्यमातून त्याग मुर्ती माता रमाई यांचे स्मारक उभे करण्यात यावे. म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. परंतु आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडुन सतत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. तरी आदरणीय कार्यसम्राट आमदार साहेब यांनी पिंपरी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “भिमसृष्टी” स्मारकाच्या मागील जागेत. त्याग मुर्ती माता रमाई यांचे स्मारक उभे करावे. व समाज बांधव तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव त्याग मुर्ती माता रमाई यांच्या स्मारकांची मागणी करत आहे. ती आपण पुर्ण कराल हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली. असे भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे बोलले. यावेळी संघटनेचे अनिल सुरवसे व सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



