गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

एम. आय. डी. सी भोसरी पोलीसांनी मंगळसुत्र चोरी करणा-या आरोपींना केले जेरबंद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ मार्च २०२४ एम.आय. डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत दि. ११/०१/२०२४ रोजी रात्री ०९/१५ वाजताचे सुमारास आदी इस्टेट सोसायटी समोर बो-हाडेवाडी मोशी पुणे येथे एक महीला रोडने पायी चालत जात असताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी तीचे गळ्यातील सोन्याचे
मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करुन नेले होते सदर बाबत एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २४/२०२४ भा.द.वि.स. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास करुन गुन्हा उघड करण्याबाबत श्री बापु ढेरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेंद्र पानसरे पोलीस उप निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन यांना आदेश दिले होते. सदर गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस उप निरीक्षक पानसरे यांनी तपास पथकातील अंमलदार यांचे मार्फतीने गुन्हा घडले ठीकाणचे आजुबाजुचे परीसरातील सी. सी. टी. व्ही फुटेज चेक करुन सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषन करुन गुनहयातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती घेतली असता सदर गुन्हयातील आरोपी दि.०३/०३/२०२४ रोजी विना नंबर प्लेटचे पल्सर मोटर सायकल वरुन खडीमशिन रोड मार्गे, मोशी येथे सोने विक्रीकरीता येणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदार मार्फत सापळा रचुन थांबले असता विना नंबरचे पल्सर मोटर सायकल वरुन दोन इसम येताच त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळुन जावु लागल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडुन त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना त्याची नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नाव १) अक्षय राजु शेरावत वय-२३ वर्षे रा.मु. हिंगणगाव पो. आष्टापुर, ता. हवेली जि. पुणे. २) अजय राजु शेरावत. वय २२ वर्षे. रा. सदर असे सांगितले तेव्हा पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अक्षय शेरावत याच्या जवळ सोन्याचे मंगळसुत्र मिळुन आल्याने सदर सोन्याच्या मंगळसुत्रा बाबत चौकशी केली असता त्यांनी ते एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४/२०२४ मधील जबरीने चोरुन नेलेले असल्याचे निष्पन्न झाले सदर मंगळसुत्र व आरोपीकडे आसलेली १,२०,०००/- रुपये किमतीची पल्सर मोटर सायकल जप्त करुन त्यांना ताब्यात घेवुन दिनांक ०३/०३/२०२४ रोजी सदर गुन्हयात अटक करुन त्यांचकडे तपास केला असता त्यांनी पिंपरी चिचवड आयुक्तालयचे हद्दीत इतर ठिकाणी गुन्हे केले असल्याचे कबुल करुन त्यांनी इतर ठिकाणी चोरी केलेले सोने हे आरोपी नामे अनिल अंकुश नानावत वय – ३९ वर्षे. रा. सणसवाडी ता. शिरुर. जि. पुणे. यास विकले असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे सोने विकत घेणा-या सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास दि.
०५/०३/२०२४ रोजी एम. आय. डी. सी भोसरी गु.र.नं. ४४ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९४,४११,३४ प्रमाणे गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता त्यानी सदर गुन्हयातील सोने काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आले असुन तपासात खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत..
१) एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४/२०२४ भा.द.वि. कलम ३९२, ३४
२) एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन गु.र.न. ४४ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९४, ३४
३) एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशन गु.र..न. १०२/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
४) देहुरोड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ९४/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२,३४
वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असुन अटक आरोपींकडुन एकुण ८ तोळे ३०० मिली ग्रॅम सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटर सायकल असा एकुन ४,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. मा. अप्पर पोलीस आयुक्त सो वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार. साो. परि-०३, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंह गौर सो. चाकण विभाग MIDC भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक श्री बापु ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पानसरे पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहुल लोखंडे, नितिन खेसे, भागवत शेप, विशाल काळे, अनिल जोशी, प्रवीण मुळूक, अक्षय क्षीरसागर आंनद जाधव अनिकेत कांबळे मपोशि खंदारे व राजु जाधव यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास राजेंद्र पानसरे पोलीस उप निरीक्षक एम. आय. डी. सी भोसरी पोलीस स्टेशनचे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!