देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

नव्या संसदेला संविधान निर्माते “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” नाव देण्यात यावे..

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड ऑल इंडिया पँथर सेनाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर निगडी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार “अर्चना निकम” यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रमुख मागणी केली की 28 मे 2023 ला नव्या संसदेचे उद्घाटन होणार आहे. ते रद्द करून 26 नोव्हेंबर संविधान दिनी करण्यात यावे व नव्या संसदेला “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” नाव देऊन संविधानची भारतीय संसदेचे अस्तित्व अस्मिता राखण्यात यावी. व तसेच संसदेचे उद्घाटन संविधान दिनी झाले पाहिजे त्यासाठी 26 नोव्हेंबर हीच तारीख ऐतिहासिक तारीख आहे. 28 मे चे उद्घाटन रद्द करून 26 नोव्हेंबर ला करावे. संसद ही भारतीय संविधानावर चालणारी आहे, धर्मसत्तेवर चालणारी नाही.
नव्या संसदेला नाव देण्याचा लढा व्यापक करून देशव्यापी केला जाईल. वेळ आल्यास दिल्लीला सुद्धा आंदोलन छेडले जाईल असा इशारा “ऑल इंडिया पँथर सेनेच्या” वतीने देण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत
महाराष्ट्र सदस्य मा. उत्तम गायकवाड महाराष्ट्र उपाध्यक्ष, बाळासाहेब शेंडगे
पुणे जिल्हाध्यक्ष, जितेश जगताप महाराष्ट्र निवडणूक अध्यक्ष, मनोज धुरंधर पुणे युवक जिल्हाध्यक्ष, किशोर काशीकर पुणे जिल्हाध्यक्ष का.आ., शिवाजी गायकवाड
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष,
आनील गायकवाड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वा. आ., अक्षय कसबे पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष,
संतोष शेंडगे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कामगार आघाडी, विजय ओव्हाळ
भोसरी विधान सभा संपर्क प्रमुख, संजय मेश्राम पॅंथर, योगेश ढाले पिंपरी चिंचवड निरीक्षक, सुरज धावारे पॅंथर, अनिल बचाटे व इतर ही असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!