
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ एप्रिल २०२४ ३३-मावळ लोकसभा मतदारसंघात काल २३-०४-२०२४ रोजी ६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले गेले. यामध्ये ज्योतीश्वर विष्णू भोसले (पनवेल, बळीराजा पक्ष), मुकेश मनोहर अगरवाल (कामशेत, अपक्ष), रफिक रशिद कुरेशी ( पिंपरी, अपक्ष), प्रफुल्ल पंडीत भोसले ( पनवेल, अपक्ष), संजोग भिकू वाघेरे ( पिंपरी, शिवसेना उबाठा) आणि गोपाळ यशवंतराव तंतरपाळे ( देहूरोड, अपक्ष) यांचा समावेश आहे.
तर काल ३ व्यक्तींनी ९ अर्ज नेले आहेत. आजपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवारांची संख्या- १० तसेच नेलेल्या उमेदवारी अर्जांची एकुण संख्या- १३४ आणि अर्ज नेणा-या व्यक्तींची संख्या-६९ झाली आहे.



