आंदोलनमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपा कार्यालया समोर निषेध आंदोलन..

पिंपरी चिंचवड दि. २३ मार्च २०२४ आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी व इंडिया आघाडीच्या वतीने काल मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी निषेध नोंदविताना सांगितले की, भारतामधील प्रमुख विरोधी पक्षा मधील बुलंद आवाज बंद करायचा असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत व सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला १५० जागा सुद्धा मिळणे कठीण आहे, त्यामुळे बिथरल्या सारखे भारतीय जनता पक्ष काम करत आहेत. काही दिवसापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक त्याच भीतीने केली आहे. आम्ही ह्या घटनेचा विरोध करत आहोत.
पिंपरी चिंचवडच्या आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीना जावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
२०१४ पासून भारतामध्ये एका जुलमी हुकमशहाचा जन्म झाला व भारताला चिन, जर्मनीच्या हिटलरशाही मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु इतिहास साक्षीदार आहे, जेव्हा हुकूमशहा जन्माला येतो तेव्हां तेव्हां भगतसिंग देखिल जन्म घेतात हे लक्षात रहावे, आपच्या प्रमुख चार नेत्यांना भाजपा सरकारने सुडबुद्धीने अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही जुलमी राजवट लवकरच संपुष्टात येईल, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ. यावेळी मानवकांबळे व असंख्य सामाजिक संघटनेचे पदाधीकारी व आपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!