अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
शहीद दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.२३ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पिंपरी येथील मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच विविध विभागातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.