आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

प्राधिकरणात आय. आय. सी. एम. आर. संस्था आणि अंघोळीची गोळी संस्थेचा खिळे मुक्त झाडं उपक्रम..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ मार्च २०२४ अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येतात. काल प्राधिकरण पोस्ट ऑफिस परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत या उपक्रमाच्या माध्यमाने त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न आय. आय. सी. एम. आर. च्या एम.सी.ए. च्या विध्यार्थ्यांनी केला. वृक्ष संवर्धन हेच हवामान बदलास उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत आहे असे एम. सि. ए. विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू म्हणाल्या.
पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न सूरू आहे असे अंघोळीची गोळी चे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या उद्यान विभागा आणि कमीन्स इंडिया फाउंडेशने देखील आपले योगदान दिले.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्राध्यापिका वंदना पेडणेकर यांनी केले. यावेळी हर्षदा तळणीकर, प्रीथा प्रसिध आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!