अखेर माता रमाई घरकुल आवास योजना ही अमलात आली- प्रा. बी. बी. शिंदे
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ एप्रिल २०२४ पावसाच्या पहिल्या थेंबाची, वाट पहाणाऱ्या, चातक पक्षाप्रमाणे, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, ही राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या प्रयत्नामुळे अखेर माता रमाई घरकुल आवास योजना ही गेली ०६ वर्षा पासून पाठपुरावा केल्यामुळे, मा. आयुक्त तथा अध्यक्ष, यांचे अधिकारा खाली रमाई आवास घरकुल योजना समिती, पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांनी अखेर मंजूर करुन, या योजने अंतर्गत बालाजीनगर, भोसरी पुणे २६ येथील एकूण ३७ लाभार्थ्यांना न्याय दिला गेला.
त्यामुळे या ३७ लाभार्थ्यांच्या निवार्याची होत असलेली अडचण दूर झाली आहे.
त्यामुळे आयुक्त तथा या योजनेचे अध्यक्ष तसेच सर्व समितीच्या पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानून, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी तसेच सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले. ही योजना सदरील ठिकाणी राबविली जावी म्हणून या सामाजिक संघटनेचे संथापक / अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे, या संघटनेचे राज्य महासचिव मा. नारायण मस्के, संघटनेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. लक्ष्मण रोकडे, या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मा. लक्ष्मण सिरसाट, राज्य सचिव मा. हरीश्चंद्र (अप्पा) शिंदे, तसेच राज्य सह संघटक मा. रामभाऊ ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. अशोक जावळे, शहर सचिव सचिन वाघमारे, तसेच पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा सायरा बानू सलीम शेख, शिलताई मानदले, शालन ताई ओव्हाळ, सुनीता ताई कांबळे, लक्षमी बळीराम सरवदे, धिवार ताई सुशीला, इत्यादी असंख्य महिला वर्ग, त्याच प्रमाणे शहर युवा अध्यक्ष सागर ओरसे, तसेच सदस्य मा. दिलीप बनसोडे, मा. तुकाराम गव्हाणे, तुकाराम सिरसाट, विठ्ठल लांडगे, सीताराम बनसोडे, संजय भोसले, सत्यप्रेम डोंगरे, काशीनाथ जाधव, इंदूबाई वाव्हळ, ताराबाई विटकर, जयश्री मोहिते,
मा. चंद्रमनी सूर्यवंशी, अंतीकाबाई जावळे, कालाबाई गुंजाळ, अनिता गुंजाळ, मा. मनोहर वाघमारे, प्रल्हाद गायसमुद्रे, संजय ओव्हाळ, धनराज मन्वर, इत्यादी अनेक मान्यवरांनी बालाजीनगर, भोसरी पुणे २६ या झोपडपट्टीत ही योजना राबविली जावी म्हणून गेली ०६ वर्षात ०५ धरणे आंदोलन आणि ०४ अमरण उपोषण करावी लागली होती.
दिनांक २८ मार्च २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या या योजनेच्या समितीने, समाज कल्याण विभाग पुणे यांचे कडून या मंजूर केलेल्या ३७ लाभार्थ्यांचे प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार प्रमाणे अनुदान बॅंक खात्यात जमा करून घेतले आहे.
म्हणून सदरील ठिकाणी प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. याच प्रमाणे अमरण उपोषण व आंदोलना दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिस प्रशासन व पिंपरी पोलिस स्टेशनच्या विविध विभागाने दिलेल्या सहकार्याबद्धल प्रा. बी. बी. शिंदे यांनी आभार व्यक्त केले. तसेच या संघटनेला आंदोलन उपोषणाला या शहरातील ज्या संघटना, पक्ष यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे ही मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.