प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ एप्रिल २०२४ सदर प्रकरणाची माहिती अशी आहे की, फिर्यादी मध्यमवयीन महिला हिला आरोपीने सुरज जैन या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन तीला तो एका मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवुन तीच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करुन बाहेर भेटण्यास बोलावुन एकत्र फोटो काढुन सदरचे फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन सदरचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तीचेकडुन वारंवार असे एकुण ३४ तोळे सोन्याचे दागिने घेतले.
फिर्यादीने पुन्हा आणखी दागीने देण्यास नकार दिला असता, त्याने तीचे फेसबुक आयडी स्वतःच्या मोबाईल मध्ये चालु करुन त्यावरुन सदरचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केल्याने निगडी पोलीस ठाणे येथे गुरनं. ११९ / २०२४ भादवि कलम ३८४,३८६,५००, ५०१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आम्ही या बाबत सखोल तपास करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांना आदेशीत केले. सदरच्या गुन्हयाचा पुढिल तपास निगडी तपास पथकाने हाती घेऊन यातील आरोपी याने वापरलेल्या फेसबुक अकाउंटचे सपोनि अंबरिश देशमुख यांनी तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीची खरी ओळख पटवुन सलग ३ दिवस सय्यदनगर हडपसर पुणे या परिसरात सापळा रचुन दि. २३/०३/२०२४ रोजी यातील आरोपी नामे सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश भिवशी कदम उर्फ द्रिश मालपाणी वय २८ वर्षे सध्या रा. सुनिल कापरे यांचे घरी भाड्याने, शेवंता निवास, सर्वे नंबर- ९० संकेत पार्क २ सय्यद नगर, पुणे यास ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याचे कडे सखोल तपासादरम्यान त्याने मैत्रीणीच्या नावाने विक्री केलेले फिर्यादी यांनी ३४ तोळे सोन्याचे दागीने फिर्यादी यांचे मॉर्फ केलेले फोटो हस्तगत करण्यात आले आहे.
आरोपी कडे केलेल्या तपासात त्याचे अशाच प्रकारे अनेक महिलांना फसवीले असल्याचे निदर्शनास आले
असुन त्याने यापुर्वी द्रिश मालपाणी या नावाने तो संगमनेर येथील मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे भासवुन नवीमुंबई येथील एका महिलेची ९३ लाखाची फसवणुक केल्याने त्याबाबत तुर्भे पोलीस ठाणे नवीमुंबई येथे २०२२ मध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला दत्तक घेणाऱ्या सोलापुर येथील एका महिलेचा छळ करुन तीला आत्महत्येस प्रवृत केले बद्दल स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर येथे सन २०१९ साली गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपीने फेसबुक, इंस्टाग्राम व इतर समाजमाध्यमाद्वारे अनेक महिलांची फसवणुक केली असल्याची शक्यता असल्याने याद्वारे सदर महिलांनी निगडी पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
(महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे)
सदरची कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त सो, मा. श्री. वसंत परदेशी अति. पोलीस आयुक्त सो, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त सो परि १ मा. राजु मोरे सहायक पोलीस आयुक्त सो चिंचवड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तेजस्वीनी कदम पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अंबरिष देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक श्री.महादेव यलमार पोलीस उपनिरीक्षक, निगडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, शिवाजी नागरगोजे, सिद्राम बाबा,
भुपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनिल पवार, नुतन कोंडे यांनी कामगिरी केली आहे.