प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ एप्रिल २०२४ साधारण चार दिवसांन पूर्वी म्हणजे दिनांक २८/ ०३ / २०२४ रोजी रात्री २२.०० वा. चे सुमारास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतील मौजे म्हाळुंगे इंगळे ता.खेड जि.पुणे गावचे हददीत फिर्यादी यांचा भाऊ कालु रकेवार वय २३ वर्षे, याचा रामसिंग नावाचे इसमाने मोबाईल फोन फोडण्याचे कारणावरुन चिडुन जावून फिर्यादी याचा भाऊ कालु मंगल रकेवार याचा फेटयाने व डाव्या हाताने गळा दाबुन तसेच उजव्या हातातील लोखंडी तव्याने डोक्यात मारुन त्यास जखमी करुन त्याचा खुन केला होता. सदर बाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९१ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व गुन्हे शाखा युनिट ३ याचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया दोन टिम तयार करुन गुन्हा उघडकीस आणन्याकरीता मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या.
सदरचा गुन्हा घडले नंतर सदर गुन्हयातील आरोपी रामसिंग हा सदर ठिकाणाहुन पळुन गेला होता त्यावेळी गुन्हे शाखा युनिट ३ कडील स्टाफने सदर घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही चेक केल्या तसेच चाकण बस स्टॅण्ड, म्हाळुंगे परीसरात तसेच पुणे रेल्वेस्टेशन परीसरात सदर परीसरात शोध घेतला सदर आरोपी हा त्याचा मोबाईल फोन बंद केल्यामुळे तांत्रिक तपास करण्यामध्ये अडचणी येत होत्या. तसेच आरोपी काम करणारे कंपन्यामध्ये तपास केला. सखोल चौकशी करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोशि/ १९४० हनमंते, पोशि/ २३९९ बाळसराफ, पोशि/ २२९६ जैनक, पोशि/ २८७७ मेरगळ या तपास टिमने राज्यातील व अंतरराज्यातील गोपनिय बातमीदाराकडून माहीती प्राप्त करुन सदर आरोपी हा त्याचे मुळगावी आला असल्याची माहीती मिळाली तात्काळ गुन्हे शाखा युनिट ३ कडील सदर तपास पथकाने आरोपीचे मुळ गावी रियाना मध्यप्रदेश येथे जावून सदर आरोपीची ठावठिकाण्या बाबत गोपनिय माहीती काढून सदर आरोपी रामसिंग सुलतानसिंग गोंड वय ३० वर्षे मुळ रा. रियाना ता. दमोह जि. दमोह राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे हा अंधाराचा फायदा घेवुन शेतामध्ये लपुन बसल्याची माहीती काढुन आरोपीस ताब्यात घेण्याकरीता जात असताना आरोपीस चाहुल लागताच सदर आरोपी पळुन जात असताना त्यास पथकाने पाठलाग करुन शिताफिने रियाना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
अशाप्रकारे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण समांतर तपास करुन व माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीस म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांनी केली आहे.