भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणार्या व दुकान फोडणार्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकल सह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ डिसेंबर २०२३ पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सो, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे सो मा अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, श्री विवेक पाटील सो, मा. सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री विठठल कुबडे सो यांनी वारंवार होणा-या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.
श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील सपोनि कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून वाहन चोरीचे विशेष पथक तयार केले व त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांनी भेटी देउन परिसरातील सीसीटिव्ही द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले व मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली.
दिनांक २६/१२/२०२३ रोजी श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याण घाडगे, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, सागर जाधव यांनी मोटारसायकल चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी नामे विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल वय २३ वर्षे रा. सध्या फिरस्ता, मुळ पत्ता- चमंधा, कसिया कौशाम्बी, भरवारी, उत्तरप्रदेश यास धावडेवस्ती भोसरी येथून सापळा लावुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व चिंचवड येथून चोरी केलेल्या ०५ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्याने पूर्वी तो काम करीत असलेल्या भोसरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास चालू आहे.
भोसरी पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने
व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी नामे विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल वय २३ वर्षे रा. सध्या फिरस्ता, मुळ पत्ता- चमंधा, कसिया कौशाम्बी भरवारी, उत्तरप्रदेश याचेकडून एकूण ०५ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०५ गुन्हे तसेच त्याने पुर्वी काम करीत असलेल्या उमेश वाईन्स, भोसरी या दुकानात चोरी केलेले ०२ घरफोडीचे गुन्हे असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आणून रूपये ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. विनयकुमार चौबे साो, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त परि. १, श्री. विवेक पाटील सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, श्री विठठल कुबडे सो, यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी गवारे, सपोनि श्री. कल्याण घाडगे, पोउपनि श्री. मुकेश मोहारे, पोलीस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, पोलीस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, मपोहवा भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
जप्त केलेल्या ०५ मोटारसायकल व मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे




